आमच्याविषयी

ग्रामपंचायत वरणगे

आपले सहर्ष स्वागत करते.
वरणगे हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात वसलेले एक सुंदर ग्रामीण गाव आहे. हे गाव कोल्हापूर शहराच्या आसपासच्या भागात येते. गावात प्रामुख्याने शेती आणि दुग्धव्यवसाय हे मुख्य व्यवसाय असून ग्रामीण जीवनशैलीची साधी आणि शांत झलक येथे पाहायला मिळते. शहर जवळ असल्यामुळे काही लोक नोकरी व व्यवसायासाठी कोल्हापूरकडे ये-जा करतात. वरणगे गावाचा परिसर हिरवागार असून गावातील लोक अतिशय मेहनती, सहकार्यशील आणि आपुलकीने राहणारे आहेत.

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत